बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

हे जीवन सुंदर आहे.....



दिनांक १३/०१/२०१५
 हल्ली मी एक नवा प्रयोग करतो आहे.
माहित नाही चूक असेल की बरोबर.....

वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापून येतात बातम्या - शाळकरी मुलांच्या आत्महत्यांच्या.

 माझ्या शाळेतली मुलं परिपाठासाठी बातम्या शोधताना वाचतही असतील...
किंवा नसतीलही.

पण वाचत असतील तर काय विचार करत असतील?
त्यांच्या कोवळ्या काळजात काय काहूर माजत असेल... ?

याचा थांग शोधण्यासाठी मी ठरवलं -
आपणच ती बातमी  वर्गात वाचून दाखवायची...
मध्ये एका लहानग्यानं बाबांनी जर्कीन घेतलं नाही म्हणून आयुष्य संपवलं.
त्यानंतर एका मुलीनं सहलखर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःला संपवलं.
.
.
अशा बातम्या मी हल्ली वर्गात वाचून दाखवतो आहे.

सुरवातीला माझी मुलं थोडी बावरली.
पण आता सरावली  आहेतप्रत्येक घटनेवर साधकबाधक बोलताहेत. कोण चूक, कोण बरोबर हे आपल्या बालबुद्धीने ठरवताहेत.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आत्महत्या केलेल्या त्या मुलांना उशीरा का होईना, पण काय करता आलं असतं यासाठी  पर्याय सुचवताहेत.

मला कल्पना आहे, या पर्यायांचा त्या मुलांना आता काहीच उपयोग नाही.
.
पण अशीच परिस्थिती माझ्या मुलांच्या बाबतीत निर्माण होईलत्यावेळी त्यांना या पर्यायांचा  नक्कीच उपयोग होईल.

मी करतोय ते बरोबर आहे ना?

२ टिप्पण्या: