आज सकाळची नऊ सव्वानऊची वेळ..
शाळेला निघण्याची लगबग.
चिरंजीवाच्या प्रश्नांना उत्तरे देत आवराआवर
सुरु.
तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
अशावेळी आलेला फोन म्हणजे दोरीवरून चालणाऱ्या
पोरीच्या हातातून काठी निसटली तर काय होईल याचा प्रत्यक्ष अनुभव.
“हेल्लो” शक्य
तितका तोल सावरत मी फोन उचलला.
“विक्रम वागरे
आहेत का?” पलीकडून
धीरगंभीर आणि कसलेला आवाज.
“हो बोलतोय,
आपण?” माझा प्रतीप्रश्न.
“मी इंद्रजीत
देशमुख बोलतोय.”
मी चक्क उडालोच.
इंद्रजीत
देशमुख म्हणजे शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक आणि युवा
संस्कार शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तरुणाईला दिशा देणारं आणि संत
साहित्याचा अभ्यासातलं लोकमान्य नाव.
त्यांचं व्याख्यान ऐकण्याचा एक-दोन वेळा योगही
आला होता .
मनानं कधी निराशेचा सूर पकडला तर त्यांच्या
व्याख्यानाच्या CD ऐकून
उमेद मिळवणारा मी.
आणि आज त्यांचा प्रत्यक्ष फोन.
हे म्हणजे भक्ताला देव प्रसन्न झाल्यावर आकाशवाणी
करत तसा अनुभव.
पण तरीही थोडा भांबावलोच.
कारण देशमुख साहेब सध्या आमच्या जिल्हा परिषदेचे Additional CEO आहेत..
“बोला ना साहेब.” मी
दबक्या आवाजात बोललो.
“तुमची कविता whatsaap वर वाचायला
मिळाली. खूप आवडली मला”
आता तर मला भोवळ यायची बाकी राहिली.
“धन्यवाद
साहेब” हे शब्द बाहेर पडायला देखील थोडा
वेळ लागलाच.
“ मी ही कविता
माझ्या आवाजात तुमच्याकडे पाठवतोय. एकदा ऐकून घ्या. मी इतरांशी शेयर केली तर चालेल
ना?”
माझ्या कवितेला साहेबांनी स्वतःचा धीरगंभीर आवाज
देणं म्हणजे कृष्णानं सुदाम्याच्या मित्राच्या मित्राच्या मित्राचे पोहे खाणं.
“चालेल ना साहेब” मी
अभावितपणे बोलून गेलो.
लगेच साहेबांनी Audio
clip माझ्याकडे पाठवली. सोबत ‘इतरांना पाठवू का?’ असा परवानगीचा प्रश्नही.
.
आजचा दिवस खरंच खूप छान गेला.
.
.
गोष्ट अजून बाकी आहे.
संध्याकाळी शाळेतून घरी परतताना पुन्हा साहेबांचा
फोन.
“तुमची कविता बऱ्याच जणांना पाठवली. खूप चांगले प्रतिसाद मिळताहेत. असेच लिहित राहा.”
“तुमचा आशीर्वाद
आणि शुभेच्छांच पाठबळ असंच सोबत राहूदे सर, धन्यवाद”
.
.
खरं तर यावेळचे ‘धन्यवाद’ साहेबांसोबत
परमेश्वरासाठीही होते.
.
एका खूप मोठ्या व्यक्तिमत्त्वाशी फोनवरून का
होईना भेटवल्याबद्दल....
-विक्रम वागरे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा